PRODUCT DETAILS
‘101 सुरस गोष्टी’ या पुस्तकात त्या सर्वकालीन आणि सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत, ज्या स्पिरिचुअल सायको-डायनॅमिक्सचे पायोनियर तसंच ‘मैं मन हूं’ आणि ‘मैं कृष्ण हूं’ बेस्टसेलर्स पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी यांनी लिहिलेल्या आहेत.
मनुष्यजीवनास अत्यंत सखोलपणे समजून घेणारे आणि समजावूनही देणारे दीप त्रिवेदी यांनी या पुस्तकात गोष्टींच्या द्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून येऊ शकेल अशा फिलॉसॉफीचा हा नजराणा पेश केला आहे. अत्यंत सहज-सोप्या भाषेत लिहिलेल्या या सुरस गोष्टी वाचकांना महापुरुष, वैज्ञानिक आणि दार्शनिकांच्या रोमांचक दुनियेच्या सफरीवर घेऊन जातात. या गोष्टींमध्ये मनुष्यजीवनाच्या प्रत्येक पैलूचा समावेश आहे. उदाहरणार्थ प्रेम, क्रोध, लोभ, अहंकार, इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स. ज्यामुळे हे पुस्तक वाचणार्यांना फक्त वाचनानंदच मिळणार नाही तर, या पुस्तकाच्या वाचनातून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलही घडून येईल. सॉक्रेटिस किंवा रामकृष्ण परमहंसांसारखे दार्शनिक, मुल्ला नसरुद्दीन यांच्या मजेदार गोष्टी, येशू ख्रिस्तांची अनमोल शिकवण असो किंवा वॉल्ट डिज्नी यांचं स्वप्न वा हेलन केलर यांची विजयी जीवनयात्रा. या गोष्टी फक्त सगळ्या वयोगटातल्या मुलांसाठीच प्रेरणादायी आहेत, असं नाही. त्यांचे आई-वडील आणि अगदी शिक्षकांसाठीही या गोष्टी तितक्याच उपयुक्त आहेत. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तात्पर्य. ज्यामध्ये दीप त्रिवेदी त्या-त्या गोष्टीतले गहिरे सायकॉलॉजिकल आणि फिलॉसॉफिकल पैलू अगदी सरळपणे समजावून देतात, ज्यायोगे ती बाब वाचकांच्या मनात अगदी सहजपणे खोलवर उतरू शकते. त्यायोगे वाचक आयुष्यात यशाची नवी शिखरंही सर करू शकतो.
The book '101 Sure Things' contains all the best things of all time, written by Deep Trivedi, a pioneer of spiritual psycho-dynamics and the author of the bestsellers 'Main Man Hoon' and 'Main Krishna Hoon'.
Deep Trivedi, who understands and explains human life very deeply, has presented this philosophy in this book that can change people's lives through things. Written in very easy-to-understand language, these stories take the reader on a journey through the fascinating world of great men, scientists and philosophers. These things include every aspect of human life. For example love, anger, greed, ego, inferiority complex. So that the readers of this book will not only get pleasure from reading it, but will also bring positive change in their lives by reading this book. Philosophers like Socrates or Ramakrishna Paramhansa, the funny stories of Mulla Nasruddin, the precious teachings of Jesus Christ or the dreams of Walt Disney or the triumphant journey of Helen Keller. These things are not only inspiring for children of all ages. These things are equally useful for their parents and even teachers. The biggest feature is the meaning of everything. In which Deep Trivedi explains the deep psychological and philosophical aspects of the subject in a very straightforward manner, so that the subject can sink into the reader's mind very easily. With that, the reader can reach new heights of success in life.